Description
इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते.
जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे.
जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे.
जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे|
————————————————————————————————————————–
अहिल्याबाई होळकर ह्या आधुनिक भारतीय इतिहासातील एक आगळे व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्या एका वैभवशंली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, दु:खाला त्यांना सामोरे जावे लागले; पण न डगमगता त्यांनी प्रजेची सेवा हे क्रत अंगिकारले.
अहिल्याबाई शूर लढवय्या, चांगल्या रणनीतीज्ज्ञ आणि न्यायवृत्तीच्या होत्या. अन्यायाची त्यांना चीड होती. त्यांनी धर्माचरण आणि राजकारणाची सुयोग्य सांगड घातली. कर्तव्यनिष्ठा, धर्मनिरपेक्षता, तसेच त्या कवेळ राजमाता न राहता लोकमाता ठरल्या.
त्यांचे जीवनही अत्यंत साधे, सरळ आणि निर्मळ होते. त्यातूनच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हिताचा सदैव विचार केला. महेश्वर ही त्यांची राजधानी. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व ओळखून महेश्वरमध्ये वस्त्रोद्योगास प्रोत्साहान दिले.
अहिल्याबाई उच्चकोटीच्या दानशूर होत्या. काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला, तीर्थस्थळी धर्मशाळा बांधल्या, पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधले. नदीकाठी घाट बांधले आणि गरिबांसाठी अन्नछत्रे उभारलीत. जनसेवेची ही अगणीत कामे करणार्या अहिल्याबाईंनी त्यांचा महेश्वर येथील राजवाडा आणि निवास साधे सर्वसाधारण प्रजेच्या घरांसारखे बांधले. त्यांचे राहणीमानही साधेच होते. हे भारतीय राजघराण्यातील जगावेगळे एकमेव उदाहरण म्हणता येईल. अशा अलौकिक कर्तृत्त्वाच्या अहिल्याबाई होळकर यांचे हे रसाळ चरित्र.
Reviews
There are no reviews yet.