Sayajirao Gaekwad Nivadak Kayade Arthat Hujur Hukum | सयाजीराव गायकवाड निवडक कायदे अर्थात हुजूर हुकूम

₹70

72Pages
AUTHOR :- Sayajirao Gaekwad
ISBN :- 9789352202560

Share On :

Description

सयाजीराव गायकवाड हे काळापुढे दृष्टी असलेले सुधारणावादी आणि शिक्षणप्रेमी राजे होते.
राजसत्तेचा उपयोग त्यांनी परिवर्तनाचे साधन म्हणून केला. प्रत्येक सुधारणा हुकूम काढून केली. हुकूम लिखित स्वरूपात असला पाहिजे असा महाराजांचा कटाक्ष होता. महाराज प्रवासात असले, घोड्यावरून प्रवास करत असले अथवा भोजनगृहात असले तरी तेथे कागद व पेन्सिल टांगलेली असे. त्यावर ते हुजूर हुकूम लिहून काढत. ते रजिस्टरमध्ये नोंदले जात. आज्ञापत्रिका ह्या सरकारी गॅजेटमध्ये जनतेच्या माहितीसाठी प्रकाशित केल्या जाई. चौसष्ट वर्षांच्या राज्यकारभारात महाराजांनी जवळ जवळ पंचाहत्तर हजार कायदे अथवा हुजूर हुकूम काढले आहेत. हा हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील एका राजाने केलेला विक्रमच आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामपंचायतीद्वारे लोकशाही प्रशासनाचा प्रयोग करणारे सयाजीराव पहिले होते. त्यांचे राज्यकारभार, आर्थिक व्यवस्था, मानकऱ्याने कसे वागावे, नोकरवर्ग, न्यायपद्धती, शिक्षण, स्थानिक स्वराज्य, सामाजिक आणि आरोग्यविषयक सुखसोयीसंबंधीचे त्यांनी केलेले कायदे अर्थात हुकूम आजही आम्हाला प्रेरणा देणारे आहेत.

Additional information

Anout Author

जन्म : ११ मार्च १८६३ – ६ फेब्रु. १९३९ महाराजा सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचा जन्म कौळाणे (नाशिक) गावात झाला. योगायोगाने ते बडोदा संस्थानचे राजा झाले. लहानपणीचे त्यांचे नाव गोपाळ होते. इ.स. १८७५ ते १९३९ या कालावधीत ते बडोदा संस्थानचे राजे होते. या दीर्घकाळात त्यांनी राजकीय, प्रशासन, शिक्षण, शेती, धर्म, समाजसुधारणा, आरोग्य, साहित्य, स्थानिक स्वराज्य अशा अनेक क्षेत्रांत लक्षणिय काम केले.
समाजसुधारणा करताना त्यांनी प्रजेतील शेवटच्या घटकाला कसा फायदा होईल याचा विचार केला. राज्यकारभार हाती घेतल्यावर काही लक्ष तोट्यात असणारे राज्य त्यांनी काटकसर आणि उत्पादनाचे स्त्रोत वाढवत जगात सातव्या क्रमांकाचे श्रीमंत बनवले. उपलब्ध झालेल्या धनाचा उपयोग त्यांनी अनेक व्यक्ती आणि संस्थांना सत्पात्री दान देत केला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sayajirao Gaekwad Nivadak Kayade Arthat Hujur Hukum | सयाजीराव गायकवाड निवडक कायदे अर्थात हुजूर हुकूम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat