fbpx

Share Bazar | Stock Market Madhun Mi 10 Koti Kase Kamavale

₹400

400 Pages
AUTHOR :- Indrazith Shantharaj | Nicolas Darvas
ISBN :- 9352208951

Share On :

Description

तुमची आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी स्टॉक्सचा वापर प्रभावीपणे करा.
भारतातले लोकप्रिय लेखक इंद्रजिथ शांथराज यांच्या ‘हाउ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग’ या पुस्तकातून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची आणि त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे याची उत्तम माहिती समजते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या शेअर बाजारातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे, अमलात आणता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचबरोबर, आधी सर्व माहिती मिळवून मग ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी कोणती धोरणे उपयुक्त ठरतील, हेही या पुस्तकात सांगितलेले आहे.
बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्रिक इंडिकेटरचे विश्लेषण करण्यापर्यंत या पुस्तकात यशस्वीपणे ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत.
प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यावरचे विश्लेषकांचे मत यात लिहिल्यामुळे, शेअर बाजाराच्या क्षणभरही उसंत नसलेल्या जगामध्ये वावरण्याची मानसिकता कशी विकसित करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी बाणवायची हेही या पुस्तकातून तुम्हाला समजेल. शिवाय, भांडवल कसे वाचवून ठेवायचे, त्याच त्या चुका परतपरत कशा करायच्या नाहीत आणि सतत शिकत राहणे कसे अनिवार्य आहे, हेही हे पुस्तक तुम्हाला दाखवून देईल.
तुम्ही नवशिके असाल किंवा अनुभवी ट्रेडर अथवा गुंतवणूकदार असाल तरीही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी, तुमची आर्थिक स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला निश्चितच मदत होईल.

इंद्रजिथ शांथराज हे २०१६ पासून पूर्णवेळ इंट्राडे ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटसंबंधी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अल्गॉरिदम ट्रेडिंग आणि स्वतःच्या विकसित केलेल्या पद्धती असे दोन्ही वापरून ते ट्रेडिंग करतात.त्यापूर्वी, बारा वर्षेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती. मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती. टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं. एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे. स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई. हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो.
– याच पुस्तकातून
प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले. लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Share Bazar | Stock Market Madhun Mi 10 Koti Kase Kamavale”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat