fbpx

Shyamchi Aai | Bapujinchya Goad Goshti

₹325

408 Pages
AUTHOR :- Sane Guruji
ISBN :- 978-9352205141

Share On :

Description

१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.
आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.

————————————————————————————————————————-
साने गुरुजींनी बाल-कुमारांसाठी लिहिलेल्या बापूजींच्या गोड गोष्टी लहानथोर सर्वांनाच अतिशय वाचनीय आहेत. मुलांचे मनोरंजन करणे म्हणजे देवाशी नाते जोडणे असे गुरुजी मानीत.
या ‘गोड गोष्टी’ मनोरंजक तर आहेतच; पण अतिशय उद्बोधकही आहेत. गुरुजींसारख्या सहृदय आणि गांधीजींच्या ठायी नितांत श्रद्धा असणाऱ्या थोर लेखकाने लिहिलेल्या या गोष्टी आजच्या पिढीला फारच उपयुक्त आहेत, हितकारक आहेत. गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवून त्याद्वारे मनावर उत्तम संस्कार करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. या गोष्टी मनापासून वाचणाऱ्या वाचकांची मने द्वेषमत्सरांपासून मुक्त होतील, विशाल होतील आणि त्यांची सहानुभूती व्यापक आणि डोळस होईल. गांधीजी म्हणजे गुरुजींच्या जीवनातील सूर्य. त्यांच्या तेजावर आपली चिमुकली ज्योत प्रज्वलित करण्याचा व आपले जीवन प्रकाशमय करण्याचा साधा, सोपा मार्ग साने गुरुजींनी दाखविला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shyamchi Aai | Bapujinchya Goad Goshti”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat