Description
भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले. प्रा. स्टीफन हॉकिंग. कायमचं शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. ही व्यक्ती अपंग आहे. व्हीलचेअरवर बसून असते. साधे शारीरिक धर्मही जिला स्वत: करता येत नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने मात्र दिली आहे अचाट बुद्धिमत्ता व अलौंकिक जिद्द. त्यांची जगण्याची जिद्द ही त्यांच्या जीवनाची एक अलौकिक बाजू. हॉकिंग यांना समाजिक मान्यता, अमाप लोकप्रियता संपूर्ण जगात मी ती 1990-2000 च्या दशकात. स्टिफन हॉकिंग यांनी विज्ञानाधारित भरपूर लेखन केलंय. ‘कृष्णविवर’ आणि ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ यावरही यांनी काम केलयं. या पुस्तकात त्यांचे शास्त्रीय संगोपन तर सांगितले आहेत; पण त्यांची शास्त्रीय व्याख्याने, त्यांच्या मुलाखती व इतरांशा व्यक्ती म्हणून ते कसे वाटतात याचाही ऊहापोह केला आहे. इ.स. 2000 नंतर परग्रहावरील वस्ती व आपले भविष्यकाळातील जीवन यावर त्यांनी दिलेली भाषणे संक्षेपाने दिली आहेत. स्टीफन हॉकिंग यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद, जिद्द व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकात आनंद मिळेल यात शंका नाही.
————————————————————————————————————————
“सर आयझॅक न्यूटन असामान्य आणि बहुरंगी प्रतिभेचे स्वामी होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील लँकाशायर येथील एका सामान्य कुटुंबात झाला होता. आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर त्यांनी विज्ञानातील आश्चर्यकारक अशी उंची गाठली, तरी जीवनभर त्यांना संघर्ष करावा लागला. आयझॅक न्यूटन यांनी प्रकाश आणि त्यांच्या विविध रंगांचे विश्लेषण करून या जगाला विविध रंगांचे ज्ञान करून दिले असले, तरीही त्यांचे स्वत:चे जीवन मात्र रंगहीन होते. सागरात निर्माण होणार्या भरती-ओहोटीचे रहस्य त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले.
या पुस्तकात न्यूटनच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना व संदर्भ, त्यांचा स्वभाव, व्यवहार व प्रवृत्ती याबाबत विस्ताराने वर्णन आहे. त्यांच्या शोधाविषयीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
आयझॅक न्यूटन आपल्या काळातील सर्वांत मोठे व प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. त्यांच्याबद्दल त्याकाळी म्हटल्या जाणार्या पुढील वाक्यांवरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावल्या जाऊ शकतो.
निसर्ग अंधारात होता.
निसर्गााचे नियम अंधारात होते.
आणि आजूबाजूला प्रकाश पडला.
न्यूटनने गुरूत्वाकर्षणाचा प्रसिद्ध सिद्धांत शोधला – ज्यानुसार पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्राकडे ओढते. न्यूटनचा महान ग्रंथ्क ‘प्रिंसिपिया’ विश्वप्रसिद्ध आहे. ज्यात त्यांची गतीच्या नियमाची (Law of Motion) व्याख्या आहे. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले.”
Reviews
There are no reviews yet.