Description
” तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का?
असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते.
मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.
अत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे.
मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे.
स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.
प्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे.
गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.
————————————————————————————————————————–
निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती.
मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती. टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं. एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे.
स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई.
हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो.
– याच पुस्तकातून
प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले.
लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते.
सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.
Reviews
There are no reviews yet.