fbpx

Sundarkand | Chanakya Neeti

₹400

440 Pages
AUTHOR :- Goswami Tulsidas, Vijaya Deshpande
ISBN :- 978-9352205073

Share On :

Description

मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ, आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत.
अभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. प्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत. वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील ३२५ सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.

अमृत, सुवर्ण, विद्या आणि गुण ग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये.
मनी कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नये. त्याचे गुप्त मंत्राप्रमाणे रक्षण करावे.
ज्याप्रमाणे प्रत्येक पर्वतावर माणिक, पाचू प्राप्त होत नाहीत आणि सर्वच जंगलांत चंदनवृक्ष उपलब्ध होत नाहीत त्याचप्रमाणे सज्जन लोक सर्व ठिकाणी भेटत नाहीत.
मनन करणे, अध्ययन करणे आणि लोकांना मदत करणे ही मानवीजीवनातील अनिवार्य कर्तव्ये आहेत.
आचरणामुळे मनुष्याच्या कुळाचा परिचय होतो. भाषेमुळे देशाचा पत्ता लागतो. आदर-सत्कारामुळे प्रेमाचा तसेच व्यक्तीच्या देहाकडे बघून तो ग्रहण करत असलेल्या अन्नाचा परिचय होतो.

————————————————————————————————————————-

गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि 26 दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाले. जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भुत ग्रंथ लाभला. त्यातील भाषासौंदर्याने हा ग्रंथ उजळून निघाला. ‘रामचरितमानस’मधील अनेक दोहे हे सहजपणे आजही ओठांवर येत असतात. रामायणाचे निरूपण करताना अगदी सोप्या भाषेत तुलसीदासांनी भारतीय जीवनपद्धतीची व्याख्याच जणू लोकप्रिय केली.
गोस्वामी तुलसीदासरचित ‘रामचरितमानस’चे कथानक हे महर्षी वाल्मीकी यांच्या ‘रामायण’ या रचनेवर आधारित आहे. ‘रामचरितमानस’ची सात कांडांत (अध्याय) विभागणी केली गेली आहे. ‘सुंदरकांड’ हा ‘रामचरितमानस’चा एक प्रमुख अध्याय आहे. महर्षी वाल्मीकीरचित संस्कृत रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून हा ग्रंथ रचला गेला असून, हा अध्याय आपल्या मायबोलीत या पुस्तकरूपाने आपल्यासमोर आलाय.
‘सुंदरकांड’ अतिशय रसपूर्ण आणि मोहक आहे, ज्यामध्ये हनुमंतांची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा विश्लेषण, घटनांची सुरेख गुंफण, चपखल शब्दांत दोहे आणि चौपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. हनुमंतांचे लीलावर्णन एवढंच साध्य न ठेवता यामध्ये ज्ञान, कर्म, नीती-अनीती आणि भक्तीचीही प्रचीती येते. हा अनुवाद वाचकांना नक्कीच भावयुक्त भक्तीची – आनंदाची अनुभूती देणारा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sundarkand | Chanakya Neeti”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat