fbpx

Swatantryaveer Savarkar | Swami Vivekananda

₹425

320 Pages
AUTHOR :- Shankar Karhade, Rajiv Ranjan
ISBN :- 978-9352206421

Share On :

Description

‘काळ्या पाण्या’ची शिक्षा म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.’
“तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण”

अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाजसुधारक होते.

सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘मित्रमेळा अर्थात अभिनव भारत’ची स्थापना केली. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ अशी त्यांची ठाम भूमिका होती.

राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.

————————————————————————————————————————–

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद.

स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती.
त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.

स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती.
सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा.
सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’

जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत.
निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swatantryaveer Savarkar | Swami Vivekananda”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat