fbpx

That Night

₹248

304 Pages
AUTHOR :- Nidhi Upadhyay
ISBN :- ‎ 9352208749

Share On :

Description

काय होईल, जेव्हा एखादा साधासा खेळ एका भयंकर गुन्ह्यात बदलेल?

नताशा, रिया, अंजली आणि कॅथरीन, कॉलेजमधल्या एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी. एकमेकांपासून भिन्न; तरी एकमेकांसोबत असलेल्या… निदान त्या रात्रीपर्यंत तरी…
तीच ती रात्र, जी त्यांच्या आयुष्यात आली होती. जिची सुरुवात तर एका व्हिस्कीच्या बाटलीने आणि औईजाच्या खेळाने झाली होती; पण ती संपली मात्र त्यांच्याच वसतिगृहात राहणाऱ्या त्यांच्या एका नकोशा मैत्रिणीच्या मृत्यूने…सानियाच्या मृत्यूने. त्यानंतर त्या मैत्रिणींनी त्या भयंकर रात्रीची पुन्हा उभ्या आयुष्यात कधीही चर्चा न करण्याचे वचन एकमेकींना दिलं. जणू ते वचन एक करार होता, ज्याने त्यांची मैत्री आणि तो अपराध गेल्या वीस वर्षांपासून दडपून ठेवला होता.
मात्र, आता कोणीतरी त्या सगळ्यांशी नवा खेळ खेळायला सुरू केले होते. जे सत्य फक्त सानियालाच माहीत होते, ते उघडकीस आणण्याची सरळ सरळ धमकीच त्यांना दिली होती. कोण होतं ते… एखादा हॅकर त्यांच्या या अपराधी मानसिकतेशी खेळत होता की सानियाचे भूत खरोखरच तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परतले होते?
चेहरा नसलेला शत्रू त्यांच्या खूप जवळ पोहोचला असताना, त्या रात्री खरोखर काय घडले होते ते जाणून घेण्यासाठी त्या चार मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र येतात. पण जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण आपापली कथा पुन्हा सांगतं, तेव्हा त्या रात्रीचे सगळे विस्कळीत तुकडे नीट जुळत नाहीत. कारण त्यांच्यापैकी कुणीही त्या रात्रीचं संपूर्ण सत्य सांगत नसतं.
‘ती रात्र’ ही मैत्रीची आणि विश्वासघाताची एक गडद, प्रचंड गुंतागुंत असलेली कथा आहे, जी तुम्हाला तिच्या हरएक वळणावर संमोहित करेल आणि गोंधळात टाकेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “That Night”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat