The Art Of Laziness | Ikigai | द आर्ट ऑफ लेझिनेस | इकिगाई |

₹450

328 Pages
AUTHOR :- Library Mindset
AUTHOR :- Ken Mogi
ISBN :- ‎ 9789349573376

Share On :

Description

आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :
उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.
चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.
ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.
आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

‘इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’
‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’ – द टाइम्स
हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पकआणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्यबदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या :कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…
तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी,तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातीलकेन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Laziness | Ikigai | द आर्ट ऑफ लेझिनेस | इकिगाई |”

Your email address will not be published. Required fields are marked *