Description
आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :
उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.
चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.
ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.
आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
तुम्हाला गृहीत धरणार्या लोकांना तुम्ही वैतागला आहात का? इतर लोकांच्या कामांना तुमच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देऊन तुम्ही थकला आहात का? आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणायला कसं शिकावं, आपला वेळ कसा वाचवायचा आणि हे करताना निरामय, संतुलित जीवनशैली कशी निर्माण करावी, हे जाणून घ्या.
‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ मध्ये आपण पुढील बाबींविषयी जाणून घेणार आहोत :
इतरांना सतत खूश करण्याच्या प्रयत्नात लेखकाला झालेला त्रास आणि त्यावर केलेली मात.
‘नाही’ म्हणायचं असताना आपण ‘हो’ का म्हणतो याची प्रमुख 11 कारणं.
इतरांचा अनादर न करता ‘नाही’ म्हणण्यासाठीची दहा सोपी तंत्रं.
इतरांना ‘नाही’ म्हटल्याने तुम्ही वाईट का ठरत नाही?
सीमारेषा आखून घेणे, आपल्या निर्णयावर ठाम राहणे आणि हे करताना इतरांच्या आदरास पात्र ठरणे कसे साधावे हे तुम्हाला ‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ शिकवेल.








Reviews
There are no reviews yet.