The Art Of Laziness | Unf*ck Yourself | द आर्ट ऑफ लेझिनेस | अनफ*क युअरसेल्फ |

₹500

352 Pages
AUTHOR :- Library Mindset
AUTHOR :- Gary John Bishop
ISBN :- ‎ 9789349573550

Share On :

Description

आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :
उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.
चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.
ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.
आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

चाकोरीत अडकला आहात ? संशयाने पछाडले आहात ? कंटाळवाणे वाटत आहे ?
‘अनफ्*क युअरसेल्फ’ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की, तुमच्यातल्या खऱ्या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या.
आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात.
तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत. काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालवणे थांबवा; कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वत: आहात. वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंधमुक्त करण्याची हीच वेळ आहे.
सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणाऱ्या; थेट मुद्द्याला हात घालणाऱ्या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.
संडे हेराल्ड

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Laziness | Unf*ck Yourself | द आर्ट ऑफ लेझिनेस | अनफ*क युअरसेल्फ |”

Your email address will not be published. Required fields are marked *