The Art Of Laziness | You Can | द आर्ट ऑफ लेझिनेस | यू कॅन |

₹425

328 Pages
AUTHOR :- Library Mindset
AUTHOR :- George Matthew Adams
ISBN :- ‎ ‎ 9788177860542

Share On :

Description

आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :
उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.
चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.
ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.
आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

तुमची ध्येयं पूर्ण करणे, अडथळ्यांवर विजय मिळवणे आणि जीवनात यशस्वी होणे हे तुम्हाला खरोखरच शक्य आहे का?
सक्षमीकरण करणार्या ‘यू कॅन’ या पुस्तकात जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स यांनी वाचकांचा वैयक्तिक विकास आणि कल्याण व्हावे यासाठी, आपल्या सर्जनशील दृष्टीला आकार देण्यासाठी एक तास शांततेत व्यतीत करणे, इतरांची सेवा करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे असे काही बदल सुचवले आहेत. कामात आपले चारित्र्य दृग्गोचर होणे, आपल्या चुकांचा अभ्यास करणे, वेळेचा विनियोग करण्यास शिकणे अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे. तुच्या परिपूर्ण व यशस्वी जीवनाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी करावयाच्या गोष्टींबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. या सवयी अंगी बाणवल्याने तुचे आयुष्य संपूर्णत: बदललेले असेल.
जगात सगळ्यांत सोपी गोष्ट कोणती असेल, तर ती आहे यशस्वी होणं! आपल्या आजूबाजूला कोण काय करतंय? कोण कसं आहे याचा विचार न करता, तुम्ही फक्त स्वत:ला जाणून घेतलं आणि ही यशाची खेळी नियमानुसार खेळलात, तर यश तुचंच हे निश्चित समजा. तुम्ही हे करू शकता!
तुम्हाला किती उंची गाठायची आहे ते तुम्हीच ठरवता. तुमच्या दृष्टिक्षेपात शिखर आहे का?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Laziness | You Can | द आर्ट ऑफ लेझिनेस | यू कॅन |”

Your email address will not be published. Required fields are marked *