Description
आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी प्रबोधनात्मक तसेच राष्ट्रीय चळवळीला पाठबळ दिले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कला प्रकल्पांचे ते आश्रयदाते होते.
सयाजीराव प्रज्ञावंत, विचारवंत आणि सुशासक होते. दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद शिकागो, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संमेलनांचे ते अध्यक्ष होते. शिकागो अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, धर्म हा मानवी जीवनाचे एक अंग आहे. ते निर्दोष आणि सत्यमय असावे.
ईश्वराची नेमकी व्याख्या काय करावी आणि परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान काय, याविषयी शिकागो धर्म परिषदेतील त्यांचे चिंतन आजची गरज आहे. धर्मसंस्था व राजसत्ता यातील भेदरेषा ओळखून सयाजीरावांनी विवेकाने बडोद्यात धर्मखाते सुरू केले. यातून धर्ममूल्ये व नागरी मूल्यांची सांगड घातली.
ज्ञानासारखे पवित्र आणि शक्तिमान दुसरे काही नाही. राजाचा मोक्ष जनकल्याणात असतो; तसेच धर्माने गरिबांचा कैवारी बनावे. हेच परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान आहे. हे सयाजीराव महाराजांचे, धर्मविचार आजची गरज आहे.
पितामह दादाभाई, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव, पं. मालवीय या व अनेक युगपुरुषांना आणि क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या सयाजीरावांचा हा वैचारिक अनमोल वारसा आजच्या वातावरणात सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारा आहे.
Reviews
There are no reviews yet.