Description
तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे.
तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे.
जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे.
अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
————————————————————————————————————————–
तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते सर्वकाही मिळू शकते; कारण तुमच्या आत एक वैश्विक शक्ती दडलेली आहे जी तुमची सगळी स्वप्ने साकार करू शकते. वैश्विक शक्ती संपूर्ण जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे.
तुमच्या आत दडलेल्या अशा अभूतपूर्व वैश्विक शक्तीचा शोध घ्यायला लावणारे हे सर्वोत्तम पुस्तक.
तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर या शक्तीचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. वैश्विक शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, याचे रहस्य या पुस्तकातून निश्चित उलगडते.
• प्रत्येक स्वप्न साकारू शकता.
• संपूर्ण जीवन बदलू शकता.
• समृद्ध जीवनात पाऊल टाकू शकता.
• जीवनात प्रेमाला आमंत्रित करू शकता.
• विसंवादाऐवजी सुसंवाद साधू शकता.
• वैयक्तिक नातेसंबंध सुदृढ बनवू शकता.
• दुःख, यातना यांच्याऐवजी सुख, शांतता नांदवू शकता.
• आजारांना पळवून निरोगी बनू शकता.
• व्यावसायिक यश संपादित करू शकता.
• दैनंदिन जीवनात चमत्कार घडवून आणू शकता.
• या शक्तीशी एकरूप होऊन स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात दैवी कृपाप्रसादाचा वर्षाव करून घेऊ शकता.
Reviews
There are no reviews yet.