fbpx

The Secret | द सिक्रेट

₹150

136Pages
AUTHOR :- Ken Blanchard; Mark Miller
ISBN :- 9788177867459

Share On :

Description

महान नेतृत्वाचे गमक काय आहे?

अधिकारपदावरील- मग तो एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत असो वा एखाद्या स्थानिक स्वयंसेवी गटात असो-प्रत्येकाला कधी ना कधी वरील प्रश्न पडतो. सध्या केन ब्लॅचर्ड, ज्यांची नेतृत्वावरील पुस्तके २० दशलक्ष प्रतींहून जास्त विकली गेली आहेत आणि मार्क मिलर, ज्यांनी अगदी तळातल्या कामगारपदापासून कामाला सुरुवात केली व चिकफिल-ए या अमेरिकेतील एका सर्वांत मोठ्या जलदगती सेवा रेस्टॉरंटच्या शृंखला असलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. महान नेत्यांना अगोदरच माहिती असलेले यशाचे गमक ते दोघे आता आपल्यासमोर खुले करीत आहेत. इतरांना कार्यप्रेरित करून मनापासून काम करायला स्फूर्ती देण्यासाठी तुम्हाला जे काही करणे आवश्यक आहे ते हे दोघं एकत्रितपणे सांगत आहेत. इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेल्या आणि २२ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या पुस्तकाची ही आवृत्ती पूर्णपणे सुधारित करण्यात आलेली आहे. यात एक नवीन प्रकरण घालण्यात आले आहे, ज्यामुळे हे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे शिकण्याचे आणि विकासाचे साधन बनले आहे.

“तुम्हाला हे गमक माहीत असेल तर परस्पर नातेसंबंध आणि परिणाम या दोहोंत भरभराट होईल. यशापासून उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या जीवनातील ही योग्य घडामोड ठरेल.”
– बॉब ब्युफोर्ड, हाफटाईमचे लेखक.

Additional information

About Author

डॉ. केनेथ ब्लॅन्चर्ड :
ब्लॅन्चर्ड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इनकॉ. (बी.टी.डी.) चे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक, प्रशिक्षक, सल्लागार. 'मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायजेशन बिहेव्हियर : युटिलायजिंग ह्यूमन रीसोर्सेस' या जगभर गौरविल्या गेलेल्या आणि लीडरशिप अँड ऑर्गनायझेशन बिहेव्हियरसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या, अनेक आवृत्त्या निघालेल्या व विविध भाषांतून अनुवाद झालेल्या पुस्तकांचे सहलेखक आहेत.
डॉ. ब्लॅन्चर्ड यांनी कॉर्नेल विद्यापीठातून शासन आणि तत्त्वज्ञान' या विषयात 'बी.ए', कोलगेट विद्यापीठातून 'समाजशास्त्र आणि समुपदेशन, विषयात ‘एम.ए' आणि कॉर्नेल विद्यापीठातून 'प्रशासन आणि व्यवस्थापन' या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. सध्या ते अॅम्टेरस्ट येथील मॅसाच्युसेट विद्यापीठात लीडरशिप अँड ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर या विषयाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. नॅशनल ट्रेनिंग लेबॉरेटरीजचे सभासद आहेत.
चेव्हरॉन, लॉकहीड, एटी अँण्ड टी, हॉलीडे इन्स, यंग प्रेसिडेंटस्, ऑर्गनायझेशन, दि युनायटेड स्टेट्स आर्म्ड फोर्सेस आणि युनेस्को अशा 'यातनाम संस्थांतून ते सल्लागार राहिले आहेत. मोबाईल ऑईल, कार्टपिलर, युनियन-७६, आयबीएम, झेरॉक्स, दि साऊथलँड कार्पोरेशन आणि तत्सम वेगाने विकसित होणाऱ्या कंपन्यांत प्रशिक्षण आणि विकास कार्यकं मात दि हर्से / ब्लॅन्चार्ड सिच्युएशनल लीडरशिप अॅप्रोच टू मॅनेजमेंट याचा समावेश करण्यात आलेला आहे. व्यवस्थापकीय सल्लागार या भूमिकेतून अमेरिकाभर विविध परिसंवादांत ते मार्गदर्शन करतात. इस्कॉन्डिओ , कॅलिफोर्निया स्थित ब्लान्खार्ड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
डॉ. स्पेन्सर जॉन्सन :
कॅन्डल कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असून, सक्रिय लेखक, प्रकाशक, वक्ता आणि संवाद सल्लागार म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. मेडिसिन अँड सायकॉलाजी या विषयावर डझनापेक्षा जास्त पुस्तके लिहिली असून त्याच्या तीस लाखांपेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथून सायकॉलाजी विषयात पदवी आणि आयर्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथून एम.डी.ची पदवी प्राप्त केली. हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि मेयो क्लिनिक येथे मेडिकल क्लर्कशिपचे कार्य केले. कार्डियाक पेसमेकरची उत्पादक कंपनी मेडिट्रॉनिक या कंपनीत मेडिकल डायरेक्टर ऑफ कम्युनिकेशन्स या पदावर राहिले. मिनॉपॉलिस येथे मेडिकल-सोशल थिंक टँक म्हणून कार्य करणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या संस्थेत रीसर्च फिजिशियन म्हणून कार्य केले. सेंटर फॉर दि स्टडी ऑफ दि पर्सन, ह्यूमन डायमेन्शन्स इन मेडिसिन प्रोग्रॅम या संस्थेत संप्रेशण आणि संवाद सल्लागार तसेच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील स्कूल ऑफ मेडिसिन येथे ऑफिस ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशनचे सल्लागार होते.
त्यांच्या 'दि प्रिशियस प्रेझेंट' या पुस्तकाचे ‘यातनाम मानसशास्त्रज्ञ डॉ.कार्ल रोगर्स तसेच डॉ.नॉर्मन व्हिन्सेंट पिले यांनी या शब्दांत महत्व विशद केले आहे:, “प्रत्येकाने हे पुस्तक वाचून त्यातील तत्त्वांवर अंमल केला तर केवढा तरी प्रचंड बदल होऊ शकेल."
'दि वन मिनिट मॅनेजर' हे डॉ.जॉन्सन यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांपैकी असेच एक पुस्तक आहे, ज्यातून खुल्या संवादातून लोक तणावमुक्तीचा आणि उत्तम आरोग्याचा अनुभव घेऊ शकतील. डॉ.जॉन्सन आणि डॉ. ब्लॅन्खार्ड या द्वयांनी ट्वेंटिथ सेंच्युरी फॉक्स या सिनेकंपनीसाठी 'दि वन मिनिट मॅनेजर' ही व्हिडियोटेपही तयार केली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Secret | द सिक्रेट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat