Description
थिंक अॅण्ड ग्रो रिच’ हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे.
१९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे ‘पैसे कमावण्याचे गुपित’ आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते.
ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे.
हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
• स्वतःची ध्येये ओळखा.
• खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा.
• जीवनात जे हवे ते मिळवा.
• परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत.
तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे.
हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे.
स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
————————————————————————————————————————–
सदर पुस्तकामध्ये अनेक व्यवसायांतील व विविध क्षेत्रांतील ज्यांच्या यशोगाथा सर्वांना ज्ञात आहेत, अशा महान आणि दिग्गज व्यक्तींच्या यशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विजयी माणूस कसा घडतो? हा प्रश्न ज्या महान माणसाने प्रथम विचारला, तो म्हणजे नेपोलियन हिल.
हा जगातल्या दिग्विजयी माणसांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
यशस्वितेचे प्रसिद्ध मंत्र सांगणाऱ्या या शिक्षकाने स्वत:चे नशीब आणि आयुष्यातल्या अपार कष्टांचा फार मोठा भाग ‘यशस्वितेच्या नियमांचे’ तत्त्वज्ञान तयार करण्यासाठी खर्च केला.
हे सगळं साध्य करण्यासाठी त्याने जगातील यशस्वी माणसांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या त्यांच्या विशिष्ट श्रद्धा व त्यांचे कर्तृत्व यांचा शोध घेतला.
नेपोलियन हिल यांनी यशस्वितेच्या एवं गुणविशिष्ट अशा १७ तत्त्वांचा शोध लावून, त्या तत्त्वांविषयी सखोल आणि तपशीलवार लिखाण केले.
यशस्वितेचं चैतन्यमयी प्रकाश देणारं हे लिखाण त्यांनी नंतर संक्षिप्त स्वरूपात आणलं; जेणेकरून ज्यांना जागृत होऊन विजयी व्हायचंच आहे त्यांना ते सहज हाताला लागेल.
त्याचा परिणाम म्हणजे यशस्वितेकडे नेणारी जादूई शिडी.
Reviews
There are no reviews yet.