Description
त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?
दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती.
कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.
इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते. जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे.
जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे.
जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे|








Reviews
There are no reviews yet.