fbpx

Vidnyanat Ase Ka Hote? | विज्ञानात असे का होते?

₹60

56Pages
AUTHOR :- Sanjay Pathak
ISBN :- 9789352201709

Share On :

Description

वनस्पतींना दिशांचे ज्ञान कसे होत असेल बरं? पडलाय कधी प्रश्न ? पाऊस किती पडला हे आपल्याला मोजता येतं माहितीये तुम्हाला? नाही? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे… विज्ञान हा खरं म्हणजे जितका पुस्तकातून शिकण्याचा विषय आहे तितकाच तो प्रत्यक्ष प्रयोगातून किंवा प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्याचा आणि शिकण्याचाही विषय आहे.
प्रयोगांमधून आपल्याला निसर्गातल्या अनेक संकल्पना उलगडतात. विज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत, नियम, तत्त्वे या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या असतील तर त्यासाठी प्रयोग करणे व करवून घेणे वा प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक असते. प्रयोगाच्या या पुस्तकात तुम्हाला वेगवेगळे प्रयोग कसे करावेत ते सोप्या पद्धतीने समजेल आणि विज्ञान विषयातली तुमची रुची वाढेल यात शंका नाही.  केवळ विद्यार्थीच नव्हे तर विज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे प्रयोग सहज करता येण्याजोगे आहेत.
तेव्हा साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून घरबसल्या विज्ञानाचे रंजक प्रयोग करा आणि तुमच्या हुशारीने इतरांना चकित करा… विज्ञानाच्या प्रयोगांचं हे पुस्तक तुम्हाला जीनियस बनवेल… चला तर मग… जाणून घेऊया. विज्ञानात असे का होते?

Additional information

About Author

संजय पाठक
डिस्टन्स एज्युकेशन, डिप्लोमा इन जरनॅलिझम अँण्ड मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट.
अनुभव : महाविद्यालयीन जीवनापासून लेखनास सुरुवात. अडतीस वर्षं
अध्यापन व प्रशासन क्षेत्रात. : सकाळ, गावकरी, लोकमत, बेळगाव तरुण भारत, दिनकर, नगारा, अमृत, विज्ञानयुग, भारतीय शिक्षण यांमधून प्रामुख्याने विज्ञान विषयावर लेखन. 'हे करून पाहा', 'विज्ञानातले का व कसे?', 'मनोरंजक विज्ञान', 'डायनोसॉर', 'किस्से शास्त्रज्ञांचे', 'शास्त्रज्ञांच्या गमती-जमती' ही सहा पुस्तके प्रकाशित. पुरस्कार : अहमदनगरच्या 'नगर टाइम्स'चा 'दा.प.आपटे पत्रकारिता पुरस्कार',
नवी दिल्ली येथील सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (सी.सी.आर.टी.) या भारत सरकारच्या संस्थेचा 'शिक्षक पुरस्कार', 'हे करून पाहा' या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा 'राजा केळकर पुरस्कार', तसेच अ.भा. बालकुमार साहित्य संमेलनाचा 'श्री.बा.रानडे पुरस्कार'. किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा 'साने गुरुजी पुरस्कार' तसेच अन्य पुरस्कार.
कार्य : खगोलशास्त्र हा विशेष आवडीचा विषय. या विषयावर व्याख्याने आणि प्रात्यक्षिके. त्यातून सर्वसामान्यांचे प्रबोधन व खगोलशास्त्राची ओळख. संस्कार शिबिरे आणि विज्ञानविषयक शिबिरे व कार्यशाळा यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विज्ञान प्रसाराच्या कार्यात सहभाग. लेखनाबरोबरच आकाश निरीक्षण आणि प्रवासाचा छंद.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vidnyanat Ase Ka Hote? | विज्ञानात असे का होते?”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat