Description
खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात सहसा दुर्मीळ असणार्या नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणार्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. त्या सार्या वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या १० मार्गांसह!
Reviews
There are no reviews yet.