fbpx

You are the Best Wife | यू आर द बेस्ट वाइफ

₹350

272 Pages
AUTHOR :- Ajay K Pandey
ISBN :- 978-9352203765

Share On :

Description

ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते.
लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं ‘प्रेम करण्याचं’ वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला.
अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.

Additional information

About Author

अजय पांडे रिहांदनगरच्या एनटीपीसी या मध्यममार्गी वसाहतीमध्ये मोठी स्वप्न उराशी बाळगत मोठा झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याने अलाहाबादच्या आयईआरटीमधून पूर्ण केलं आणि पुण्याच्या आयआयएममधून एमबीए केलं. त्यानंतर त्याला कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. आता सध्या तो कॉग्निझन्ट, पुणे येथे नोकरी करत आहे. त्याचं स्वप्न होतं शिक्षक बनायचं; परंतु दैवाने त्याला आयटी क्षेत्रात आणून सोडलं.
प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, वाचन हे त्याचे छंद आहेत. विविध ठिकाणी केलेल्या प्रवासातून त्याची ओळख विविध संस्कृती, लोकांशी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य जगणारी लोक परस्परांशी एका अनाकलनीय बंधाने कशी जोडलेली राहतात, याचं कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. ट्रेकिंगने त्याला जगण्यातली आव्हानं पेलायला शिकवलं, खेळांची आवड लागली. पुस्तक वाचनामुळे आयुष्य जगण्याची प्रेरणा जिवंत राहते असं त्याला वाटतं.
यू आर द बेस्ट वाइफ ही त्याने लिहिलेली पहिली कादंबरी, आपल्या आयुष्यातल्या सत्य घटना आणि जगण्यातून शिकलेले धडे त्याने यातून मांडले आहेत.
लेखनाव्यतिरिक्त त्याला आपला आदर्श असलेल्या मदर टेरेसा यांच्या मार्गावरून चालायचे आहे, समाजाचे ऋण फेडावे अशी त्याची इच्छा आहे. त्याकरता एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून वृद्धांना आधार आणि गरीब, गरजू मुलांना शिक्षण देण्याची योजना आहे.
आपल्या या पहिल्या कादंबरी नंतर अजयने अजून दोन बेस्टसेलर पुस्तके लिहिली आहेत, ज्यांची नावे – हर लास्ट विश आणि यू आर द बेस्ट फ्रेन्ड अशी आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “You are the Best Wife | यू आर द बेस्ट वाइफ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat