Description
तुमची ध्येयं पूर्ण करणे, अडथळ्यांवर विजय मिळवणे आणि जीवनात यशस्वी होणे हे तुम्हाला खरोखरच शक्य आहे का?
सक्षमीकरण करणार्या ‘यू कॅन’ या पुस्तकात जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स यांनी वाचकांचा वैयक्तिक विकास आणि कल्याण व्हावे यासाठी, आपल्या सर्जनशील दृष्टीला आकार देण्यासाठी एक तास शांततेत व्यतीत करणे, इतरांची सेवा करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे असे काही बदल सुचवले आहेत.
कामात आपले चारित्र्य दृग्गोचर होणे, आपल्या चुकांचा अभ्यास करणे, वेळेचा विनियोग करण्यास शिकणे अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे. तुच्या परिपूर्ण व यशस्वी जीवनाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी करावयाच्या गोष्टींबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. या सवयी अंगी बाणवल्याने तुचे आयुष्य संपूर्णत: बदललेले असेल.
जगात सगळ्यांत सोपी गोष्ट कोणती असेल, तर ती आहे यशस्वी होणं! आपल्या आजूबाजूला कोण काय करतंय? कोण कसं आहे याचा विचार न करता, तुम्ही फक्त स्वत:ला जाणून घेतलं आणि ही यशाची खेळी नियमानुसार खेळलात, तर यश तुचंच हे निश्चित समजा.
तुम्ही हे करू शकता!
तुम्हाला किती उंची गाठायची आहे ते तुम्हीच ठरवता. तुमच्या दृष्टिक्षेपात शिखर आहे का?
Reviews
There are no reviews yet.