fbpx
Baba Bhand

बाबा भांड (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे.

सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ साली पुस्तकरूपाने २००१ साली प्रकाशित झाली.

विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी १९७५ मध्ये पत्‍नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली.. त्यांनी आजवर (ऑगस्ट २०१५) १७००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, तीन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat