fbpx
Rajan Gavas

गवस, राजन : (२१ नोव्हेंबर १९५९). राजन गणपती गवस. मराठीतील नामवंत कथा-कादंबरीकार, कवी आणि ललितगद्यलेखक म्हणून प्रसिद्ध.
त्यांचा जन्म कोल्हापूर येथील गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.
मूळ गाव करंबळी ( जि. कोल्हापूर). त्यांचे एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण अत्याळ येथे झाले. त्यांनी १९८० साली गडहिंग्लज येथून बी.ए., १९८२ साली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. तसेच ‘भाऊ पाध्ये यांचे कथात्म साहित्य’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे २३ वर्षे, पुणे विद्यापीठ येथे २००५ ते २००७ या कालावधीत मराठीचे अध्यापन केले. ते २०१९ साली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रांतातील गडहिंग्लज गारगोटी या प्रदेशातील सामाजिक सांस्कृतिक वातावरणात गवस यांची जडणघडण झाली. देवदासी व माकडवाला यांच्या चळवळीत त्‍यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्रसेवा दल आणि युक्रांदमध्ये त्यांची वैचारिक घडण झाली. शोषितांविषयी आस्था, कृषिजन संस्कृतीचे वास्‍तवदर्शन आणि सामाजिक चळवळीतील अंतविरोधाचे प्रत्ययकारी चित्रण, अमानवी धर्मश्रद्धांचा प्रतिवाद, सामाजिक जीवनाकडे पाहण्याचा नवनैतिक दृष्टिकोण आणि सीमावर्ती बोलींचा सर्जनशील वापर हे गवस यांच्या साहित्यलेखनाचे विशेष होते.

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat