fbpx

Krishnaniti | कृष्णनीती

₹350

288Pages
AUTHOR :- Girish Jakhotiya
ISBN :- 9788177869484

Share On :

Description

जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या. बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला. श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती.
कृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात. डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.
या पुस्तकात कृष्णाचे उलगडलेले नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व, त्याचे डावपेच, त्याची रणनीती, त्याचा प्रेमाचा सिद्धांत आपण सर्वांनीच आज आचरणात आणला तर आपली आणि आपल्या या भारत देशाची निश्चितच प्रगती होईल.
अर्थात २१ व्या शतकातही आपला ‘प्रिय कृष्ण’ आचरणीय आहे, गरज आहे ती फक्त त्याच्या नीतीकडे डोळसपणे पाहण्याची!

Additional information

About Author

डॉ. गिरीश प. जाखोटिया
• व्यावसायिक
१) "जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स" या व्यवस्थापकीय-उद्योजकीय-वित्त
सल्लागार संस्थेचे प्रमुख संचालक
२) ६० पेक्षा अधिक कंपन्या व संस्थांचे सल्लागार (टाटा ग्रुप, सारस्वत बैंक महिंद्रा ग्रूप, सिमेंस, ब्रिटिश पेट्रोलियम, बेडेकर्स, पिताम्बरी, घाटगे पाटील, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, बजाज ऑटो इ.)
३) सेंट्रल बैंक ऑफ ओमान, जागतिक बँक, CIMA-London, Colombo, ETA-Ascon दुबई यासाठीही काम केले.
४) AGNI (अग्नी) या Management Model चे पेटंट अपेक्षित
५) तीन Copy Rights नावावर
६) २००० पेक्षा अधिक व्याख्याने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंचांवरून दिली.
• लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर) चे “उपाध्यक्ष" (दोन वर्षांसाठी)
• सध्या मुंबई ग्राहक संघ- पार्ले विभागाचे अध्यक्ष

• वैचारिक लेखनासाठी पुरस्कार
१) भाई माधवराव बागल पुरस्कार (एक लक्ष रुपये), महाराष्ट्र शासन
• साहित्यिक पुरस्कार
१) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
२) आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी
३) पुणे मराठी ग्रंथालय, पुणे
४) पद्यगंधा प्रतिष्ठान, नागपूर
५) साहित्य समन्वय पुरस्कार, धारवाड
६) दिवा काव्य पुरस्कार, मुंबई
७) जैन साहित्यरत्न पुरस्कार, जळगाव
८) स्व. डॉ. पन्नालाल भंडारी स्मृती पुरस्कार, जळगाव
९) लोकमान्य सेवा संघ, के, ना, सी पेंढारकर ग्रंथ पुरस्कार
• अध्यापनातील पुरस्कार
1) All India Best young Professor Award ( 1996, by AIMS)
2) Best Management Teacher Award, (1997, by Bombay Management
Association)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Krishnaniti | कृष्णनीती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat