Description
मोठी माणसे कर्तृत्वाने मोठी असतातच; पण त्यांचे विचारही प्रेरणादायी असतात. अनेक प्रसंगी आणि विविध विषयांवर या थोरामोठ्यांनी व्यक्त केलेल्या आपल्या मतात इतका अर्थ दडलेला असतो की ही मते प्रेरणा देतात. स्थळ, काळ आणि देश -भाषांच्या सीमा ओलांडून मार्गदर्शन करणारे हे विचार सर्वव्यापी असतात. आपल्या जीवनाला दिशा देण्यात या मौलिक सुविचारांची भूमिका महत्त्वाची असते. काय करावे आणि काय करू नये, अशी गोंधळाची स्थिती निर्माण होते तेव्हा हे थोरामोठ्यांचे विचारच आपल्याला योग्य दिशा दाखवितात. या पुस्तकात जगभरातील थोर बुद्धिवंत आणि विचारवंतांचे असेच निवडक सुविचार ईश्वर, दान, दया, आनंद, परिश्रम, कला, चारित्र्य, जीवन, ज्ञान, धर्म, धैर्य, नम्रता, पुस्तक, कीर्ती, प्रेम, भाग्य, मन, मित्रता, विचार, चिंतन, संपदा, विश्वास, सुख, सौंदर्य, ध्येय इ. विषयानुसार स्वतंत्र स्वरूपात संकलित केली आहेत. आपल्या जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे जगभरातील थोरामोठ्यांचे हे सुविचार सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरणारे आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त असा खजिना आहे. |
Reviews
There are no reviews yet.