Description
ऋतू बदलते की आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. घरातील सर्व लहानथोर सदस्यांना अधून मधून सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, जुलाब, अपचन, खोकला यांसारखे विकार होत असतात. अशा विकारांसाठी दरवेळी डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही. तसेच हे आजार सोबत घेऊन दैनंदिन कामेही करता येत नाहीत. अशा छोट्या-छोट्या विकारांवर आजीच्या बटव्यात अनेक गुणकारी औषधी आहेत. या औषधांची माहिती इथे करून दिली आहे. त्यांचे उपयोगही सांगितले आहेत. या बटव्यातील औषधी वेगळ्या नाहीत. आपल्या घरात सहज उपलब्ध असणार्या पदार्थांचेच हे औषधी उपयोग आहेत. ही माहिती आपल्या घराला दवाखान्यापासून वाचविणारी आणि निरामय आरोग्य प्रदान करणारी आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आजीबाईच्या बटव्यातील कोणत्याही औषधाला साईड इफेक्ट्स नाहीत. |
Reviews
There are no reviews yet.