Description
परमेश्वराच्या निर्मितीत माणूस सर्वश्रेष्ठ असून त्याच्याकडे अनेक प्रकारची सामर्थ्य आहेत; मात्र या सामर्थ्यांची जाणीव असलेले किती आहेत? खरंतर ते आपल्या निम्म्या सामर्थ्याशी अपरिचित असतात. या सर्व सामर्थ्याला ओळखून आणि त्याचा योग्य वापर करून माणूस या जगातील सर्व प्रकारची समृद्धी मिळवू शकतो, जे हवे ते काम करू शकतो, जे हवे ते बनू शकतो.
स्वेट मार्डेन यांचे हे पुस्तक तुम्हाला फक्त तुमच्यातील या सामर्थ्याची ओळख करून देणारे नाही, तर त्यांचा विकास करण्याचे आणि त्यांच्या साहाय्याने हवे ते मिळविण्याचे उपायही सांगणारे आहे. या देशातील अर्ध्याहून अधिक लोक गरिबीत जीवन जगतात, तरीही ते त्यात समाधानी आहेत. ते त्यालाच आपले नशीब समजतात. अर्थात त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली तर त्यांना हवे ते मिळू शकते आणि अशा प्रकारे ते आपलाच नाही तर देशाचाही विकास करू शकतात.
Reviews
There are no reviews yet.