Description
” नव्या पिढीचे तरुण आणि बालकांवर संस्कार करण्याचे काम आई-वडील, गुरुजनवर्गाबरोबरच चांगले साहित्यही करत असते. साहित्यातून ज्ञानाची गंगाच दारी येते. त्यातून मग चांगले विचार, चांगले मूल्ये आणि चांगल्या जगण्याची शिदोरीच लाभते. ‘श्रीमती इंदुमती यार्दी यांनी ह्या पुस्तकात जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंजक पद्धतीने सांगितले आहे. ह्याच्या वाचनाने त्या थोरपुरुषांच्या जीवनमूल्यांचे दर्शन होईलच; पण ते प्रसंग नव्या पिढीला पथदर्शकही ठरतील. या विविध प्रसंगातून प्रामाणिकपणा, सेवाभाव, ज्ञानपिपासूवृत्ती, त्याग, लोकशाही निष्ठा, मानवता, अहिंसा, प्रेम नि परोपकाराची भावना वाढीस लागणे, ह्या संस्कारांची ओळखही, होते.
चांगले संस्कार चांगली माणसे घडविण्यास मदतच करत असतात. याचा प्रत्यय हे पुस्तक देते.
————————————————————————————————————————–
शं. रा. देवळे लिखित ‘जगातील महान व्यक्ती’ या पुस्तकात विश्वातील अत्यंत नामवंत अशा दहा व्यक्तींच्या खडतर जीवनाचा वेध घेऊन त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. सॉक्रेटिस, कोलंबस, इसाप, गॅलिलिओ, कॉन्फयुशिअस, टॉयस्टॉय यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींनी साध्या बाबतींतून आपला ठसा उमटवला. याचे चरित्र वर्णन साध्या-सोप्या भाषेत व सुटसुटीत वाक्यरचनेद्वारे लेखकाने प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे.
हे पुस्तक प्रत्येक विचारवंताच्या जीवनकार्याला उलगडून दाखवताना आपण समस्येला कसे सामोरे जावे, याची सहज शिकवण देऊन जाते. या पुस्तकाची रचना गोष्टीस्वरूप असली तरी सर्व वयोगटांसाठी उपयुक्त व ज्ञानवर्धक अशी आहे.
प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक! “
Reviews
There are no reviews yet.