Intraday Trading I Multibagger Stocks

₹360

368 Pages
AUTHOR :- Indrazith Shantharaj , Prasenjit Paul
ISBN :- 978-9352205912

Share On :

Description

” तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची
आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते.

मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.
अत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे.

मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे.
स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.

प्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे.
गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये

गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.

————————————————————————————————————————

बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत.

कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.

खरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते.

एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते.
त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे.
त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.

तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Intraday Trading I Multibagger Stocks”

Your email address will not be published. Required fields are marked *