Share Bazar 41 Sutra I Multibagger Stocks

₹425

360 Pages
AUTHOR :- Mahesh Chandra Kaushik , Prasenjit Paul
ISBN :- 978-9352205929

Share On :

Description

” तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते.

मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.
अत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे.

मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे.

स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.
प्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे.

गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये
गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.

————————————————————————————————————————–

शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते.

एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो.
याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो.

किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे.

शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे.
या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Share Bazar 41 Sutra I Multibagger Stocks”

Your email address will not be published. Required fields are marked *