fbpx

Balidan | बलिदान

₹299

232 Pages
AUTHOR :- Swapnil Pandey
ISBN :- 978-9352207886

Share On :

Description

इंडियन पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांएवढे धैर्यवान आणि साहसी लोक क्वचितच पाहायला मिळतील आणि तरीही त्यांची नावं कधीही प्रकाशात येत नाहीत. ‘बलिदान’ बॅजच्या अत्यंत पात्र हक्कदारांवर अत्युच्च पर्वतराशीवरील सीमारेषाचं संरक्षण आणि भयानक दहशतवादाचं उच्चाटन या पराकोटीच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. या शूर योद्ध्यांभोवती एक गूढ वलय आहे. त्यांच्याविषयी असंख्य आख्यायिका आहेत. त्यांच्या मोहिमांविषयी एवढी गुप्तता पाळली जाते की डॅगर, घोस्ट, व्हायपर आणि डेझर्ट स्कॉर्पियो अशासारख्या सांकेतिक नावांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अफाट आणि असीम साहसकथांच्या या लक्षणीय संग्रहामध्ये स्वप्निल पांडेंनी काही महान स्पेशल फोर्सेस अधिकाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला आहे. कर्नल संतोष महाडिक, कॅप्टन तुषार महाजन, ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत, सुभेदार मेजर महेंद्र सिंग आणि इतर काही साहसवीरांचा वाचकांशी परिचय करून दिला आहे. एक वर्षाच्या कालावधीत या सैनिकांच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या दोनशेपेक्षाही अधिक मुलाखती, LOC आणि LAC जवळच्या विविध स्पेशल फोर्सेस युनिटला दिलेल्या अनेक भेटींवर हे पुस्तक आधारित आहे. या अनाम, अप्रसिद्ध सैनिकांना गूढ वलयातून बाहेर काढून लोकांसमोर आणायचं हे ‘बलिदान’ लिहिण्यामागील उद्दिष्ट आहे.

Additional information

About the Author

द फोर्स बिहाइंड द फोर्सेस, लव्ह स्टोरी ऑफ अ कमांडो आणि सोल्जर्स गर्ल ही स्वप्निल पांडेयांनी विस्तृत संशोधन करून लिहिलेली पुस्तकं भारतीय सैनिक आणि त्यांच्या परिवारांचं कार्य आणि जीवनपद्धतीची जाणीव लोकांना व्हावी, या उद्देशाने लिहिलेली आहेत. त्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, मेस्राच्या माजी विद्यार्थिनी आहेत. विप्रो आणि ‘एचडीएफसी'सारख्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं असून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नियतकालिके आणि वृत्तपत्रांमधील त्यांचे ब्लॉग्ज लोकप्रिय आहेत. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर चर्चासत्रांमध्ये पॅनेलिस्ट म्हणूनही त्या झळकतात. त्या लष्कराच्या बाजूने बोलणारा महत्त्वाचा आवाज आहेत. ‘इस्रो'सारख्या संस्थांततर्फे त्यांचा सत्कार झाला आहे.

त्यांच्या संपर्कासाठी :

teamgirlandworld@gmail.com
Twitter at : @swapy6
Facebook : ‘Author Swapnil Pandey’
Instagram : @swapnil pandey author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Balidan | बलिदान”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat