fbpx

A. P. J. Abdul Kalam | ए.पी.जे. अब्दुल कलाम

₹125

136Pages
AUTHOR :- Shankar Karhade
ISBN :- 9788177863444

Share On :

Description

दक्षिण भारतातील रामेश्वरम्जवळील एका खेड्यातील गरीब मुलगा. वडील नावाडी. मुलाला शिकावं वाटतं. प्रयत्न आणि जिद्दीनं तो आत्मविश्वासाने शिकतो. परमेश्वराबद्दल त्याला नितांत आदर असतो.
शिक्षणामुळे त्या मुलाच्या जीवनाचे सोने होते आणि हा खेड्यातील पोरगा भारताचा राष्ट्रपती बनतो. असा आहे चित्तथरारक प्रगतीचा प्रवास अब्दुल कलामांचा.
भारतही उपलब्ध तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने जगात उभा राहू शकतो, हे कलामांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न ते भारतीय तेजस्वी मुलांत शोधतात. एका सामान्य मुलाने शिक्षण आणि प्रयत्नाने घेतलेली ही उत्तुंग झेप अंधारातून सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारी आहे.
अब्दुल कलामांची ही चरित्र कहाणी लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीने शंकर कहाडे यांनी सांगितली आहे. शंकर कहाडे हे आजचे मराठीतील मुलांसाठी चरित्र लेखन करणारे महत्त्वाचे लेखक आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “A. P. J. Abdul Kalam | ए.पी.जे. अब्दुल कलाम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat