fbpx

Aaple San Aapli Sanskruti | आपले सण आपली संस्कृती

₹250

80 Pages
AUTHOR :- Eknath Avhad
ISBN :- 978-9352204557

Share On :

Description

बालकांसाठी साहित्यनिर्मितीचे वरवर सोपे वाटणारे कार्य मुळात खूप कठीण आहे.
आणि ही कठीण गोष्ट आपल्या लेखणीतून सोपी करून सांगणारे मुलांचे लाडके लेखक एकनाथ आव्हाड आता सर्वज्ञात आहेत.
त्यांची बालसाहित्याची 30 पेक्षाही अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
साने गुरुजी कथामालेचा उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार त्यांना लाभलेला आहे.
भारत सरकारचा बालसाहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार, मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.
प्रस्तुत ‘आपले सण, आपली संस्कृती’ या पुस्तकात भारतीय सणउत्सवांसंबंधीच्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत.
पारंपरिक दिवाळी, होळी, संक्रांतीसारख्या सणांबरोबरच स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक अशा विभूतींच्या कथाही यात आहेत.
या कथांच्या माध्यमातून भारतीय सण, उत्सव, परंपरा आणि संस्कृतींची त्यांनी छान ओळख करून दिली आहे.
देशाभिमान जागवणार्‍या या कथा मुलांचे सामान्यज्ञान वाढवतीलच; पण ज्ञान-मनोरंजनातून बालकुमारांची व्यापक संस्कारशील मनेही घडविण्याचे काम प्रभावीपणे करतील, असा विेशास वाटतो.
एकनाथ आव्हाड यांची लेखणी यापुढेही बालसाहित्यात अशीच मोलाची भर घालत राहील, त्यासाठी त्यांना उदंड शुभेच्छा..!
– डॉ. तारा भवाळकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aaple San Aapli Sanskruti | आपले सण आपली संस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat