Description
‘ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगले’, असे म्हटले गेले असले तरी निराशा, अडचणी, संकटे, अपयश मिळण्याची भीती सामान्य माणसाला सतत नाउमेद करते; परंतु मार्गात येणार्या सर्व अडचणी पार केल्यावर जे सुख मिळते, आनंदाचा आणि दिव्यत्वाचा जो प्रकाश मिळतो, तो अतुलनीय असतो. जय-पराजय तर आयुष्याचा एक भाग आहेत. त्याला हसतमुखाने सामोरे जायचे तर आपल्या मनात प्रसन्नतेचं झाडं सदा बहरलेलं हवं. त्यासाठी काय करावे? हे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. एक समृद्ध व यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी काय करावे? जीवनातून नीरसतेला हद्दपार करून आयुष्य सप्तरंगी कसे करावे याचे गुपित उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक.
————————————————————————————————————————-
ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण उद्दिष्ट गाठायचे असते, यशाच्या शिखरावर आपला झेंडा रोवायचा असतो, त्याने येणार्या प्रत्येक संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. जीवनात उद्भवलेल्या प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ध्येयप्राप्तीचा ध्यास घेऊन सतत त्या दृष्टीने कार्यक्षम राहिल्यास म्हणजेच ‘ध्येयवेडे’ झाल्यास यश तुमचेच आहे!
Reviews
There are no reviews yet.