Description
“धम्मपद’ हा बौद्ध साहित्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा व प्रेरणादायी ग्रंथ आहे. बुद्धांच्या उपदेशांचा सार या ग्रंथात संकलित करण्यात आला आहे. साध्या, प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या गाथांमधून जीवन जगण्याची दिशा, नीती, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये यांचा सखोल विचार यात मांडलेला आहे.
‘धम्मपदा’तील प्रत्येक गाथा म्हणजे एक जीवनसूत्र आहे. त्या वाचकाला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात आणि दैनंदिन जीवनात अनुसरण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे हा ग्रंथ फक्त धार्मिक किंवा तात्त्विक संदर्भापुरता मर्यादित न राहता प्रत्येक सामान्यांतील सामान्य माणसासाठी मार्गदर्शक ठरतो.
धम्मपद हे पुस्तक…
* विद्यार्थ्यांसाठी चारित्र्य घडवणारे
* अभ्यासकांसाठी ज्ञानवर्धक
* वाचकांसाठी आत्मिक शांती देणारे
* सर्वांसाठी आयुष्य समृद्ध करणारे आहे.
जगभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या आणि अनुवादित झालेल्या ग्रंथांपैकी एक असलेले ‘धम्मपद’ आजही तेवढेच कालसुसंगत आहे. मानवी जीवनातील अंधार घालवून अंतर्मनातील प्रकाश शोधण्यासाठी या ग्रंथासारखा शाश्वत साथीदार दुसरा नाही.”
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.








Reviews
There are no reviews yet.