Description
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाहुल्यांचे आकर्षण असते. छोट्या मुलांना बाहुलीसोबत खेळताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. लहान मुली आपापल्या घरून बाहुल्या आणून त्यांना कपड्यांनी, दागिन्यांनी, फुलांनी सजवून भातुकलीचा खेळ खेळतात व बालपण रम्य करतात.
प्रस्तुत पुस्तकात वेगवेगळ्या बाहुल्या आणि खेळणी कशा तयार करायच्या, याची माहिती व तंत्र दिलेले आहे. हे तंत्र अगदी सहज सोपे आहे. लहान मुलांना याचा वापर करून नवनवीन खेळणी बनवता येईल. शिवाय याने पालकांचीही महागडी खेळणी घेण्यापासून सुटका होईल आणि नवनिर्मितीचा आनंद घेण्याबरोबरच मुलांची सर्जनशीलता वाढीला लागेल. आपण स्वत: बनवलेली खेळणी मुले मोठ्या आस्थेने खेळतील.
Reviews
There are no reviews yet.