fbpx

Good Vibes, Good Life | गुड वाइब्स गुड लाइफ

₹350

264 Pages

AUTHOR :- Vex King
ISBN :- 9789352203192

Share On :

Description

आता आहात त्यापेक्षा शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीत रूपांतरित व्हा!
स्वत:वर निखळ प्रेम करायला कसं शिकाल? नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक भावनांत कसं कराल? चिरस्थायी आनंद मिळवणे शक्य आहे का?
या पुस्तकात इन्स्टाग्राम गुरू वेक्स किंग तुमच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देतील. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून वेक्स यशस्वी झाले आणि हजारो तरुणांसाठी दीपस्तंभ ठरले.
आता स्वानुभव आणि अंतर्ज्ञानी सुज्ञपणा यातून ते तुम्हालाही यासाठी प्रेरित करीत आहेत : स्वत:ची काळजी कशी घ्यावी, नकारात्मक ऊर्जेच्या कचाट्यातून कसे बाहेर पडावे आणि स्व-कल्याणास कसे प्राधान्य द्यावे? जागरूकता व ध्यानधारणेसहित सकारात्मक जीवनशैलीच्या सवयी कशा अंगीकाराव्यात? आपले ध्येय प्रकट करा आणि विविध तंत्रांचा वापर करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आयुष्यात महान संधींना आमंत्रित करण्यासाठी स्वत:च्या श्रद्धा कशा बदलाल? भीतीवर मात करा आणि वैश्विक प्रवाहाशी स्पंदने जुळवा. आपला उदात्त हेतू शोधा आणि इतरांसाठी दीपस्तंभ बना. आपले विचार, भावना, शब्द व कृती या सगळ्यांची पद्धत बदलली की, तुम्ही जग बदलायला कसे सुरू करता हे वेक्स तुम्हाला या पुस्तकातून दाखवतील.
“जे लोक अंधारात रस्ता शोधण्यासाठी चाचपडत आहेत आणि ज्यांना अधिक सुंदर व अर्थपूर्ण आयुष्य जगायचे आहे त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल.” – लेविस होवेज, न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलिंग लेखक व ‘द स्कूल ऑफ ग्रेटनेस’ या पॉडकास्टचे सूत्रधार  

Additional information

About Autho

वेक्स किंग हे एक सोशल मीडिया प्रभावकर्ता, लेखक, मानस-प्रशिक्षक व जीवनशैलीविषयक मार्गदर्शक आहेत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना वेक्स यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ते अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अनेकदा त्यांचं कुटुंब निराश्रित असायचं, परिणामस्वरूप त्यांना अशा त्रासदायक वस्त्यांमध्ये राहायची वेळ आली जिथे वर्णभेदाचा सामना करावा लागला. असे असूनही वेक्स यांनी त्यांचे आयुष्य उत्तम स्वरूपात यशस्वीरीत्या बदलून दाखवले. आता ते बॉन विटा नावाच्या एका मोठ्या जीवनशैलीविषयक ब्रँडचे सर्वेसर्वा आहेत. ज्या कुणाला अधिक आनंदी व समृद्ध आयुष्य जगायचे आहे त्यांच्यासाठी हा ब्रँड म्हणजे जणू सकारात्मक ऊर्जेचे केंद्रच आहे. आपल्या (@vexking) या लोकप्रिय इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे वेक्स हजारो तरुणांचे प्रेरणास्थान बनले असून त्यांनी Good Vibes Only # GVO नावाची एक चळवळ सुरू केली. या चळवळीतून सकारात्मक ऊर्जेद्वारे इतरांना त्यांचे आयुष्य अधिक चांगले कसे बनवावे यासाठी ते मदत करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Good Vibes, Good Life | गुड वाइब्स गुड लाइफ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat