fbpx

Hasat Khelat Vidnyan Shika | हसत खेळत विज्ञान शिका

₹100

120Pages
AUTHOR :- D.S.Etokar
ISBN :- 9788177867138

Share On :

Description

सर्जनशीलतेची भावना प्रत्येक व्यक्तीत निसर्गतःच असते. कधी ती सुप्तावस्थेत असते, तर कधी प्रकट अवस्थेत असते. नवनिर्मितीचे बाळकडू जर मुलांना बालपणीच मिळाले तर भावी आयुष्यात ही मुले विधायक कार्य करू शकतात. शास्त्रीय ज्ञान हे खूप चिकित्सेवर आधारित असते, किचकट असते हे जरी खरे असले तरी हा समज ‘हसत-खेळत विज्ञान शिका’मधून दूर होण्यास नक्कीच उपयोग होईल.
सुटीच्या दिवशी, रिकामा वेळ असताना सहज सुलभ मिळणाऱ्या वस्तू जमा करून त्यांचा खेळणी म्हणून कसा उपयोग करायचा, त्यातून नवनिर्मिती कशी करायची, त्याचे तत्त्व सहज कसे जाणून घ्यायचे याचे मार्गदर्शन अत्यंत सुबोधतेने हे पुस्तक करते.
‘हसत-खेळत विज्ञान शिका’ हे पुस्तक पूर्णतः वैज्ञानिक कसोटीवर आधारित आहे; परंतु तुम्हाला प्रात्यक्षिक करताना कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येकाने वैज्ञानिक बनावे, या दिशेने नेणारे हे पुस्तक. हेच याचे गमक!

Additional information

About Author

"देविदास संपतराव इटोकर
(डी.टी.सी., डी. एम., ए. एम.)
जन्म- २३ सप्टेंबर १९४५
• निवृत्त चित्रकला शिक्षक
• चित्रकलेवरील शोध निबंधास १९८९ साली प्रथम पुरस्कार
• महाराष्ट्र शासनाचा (१९५७) आदर्श शिक्षक पुरस्कारही
• कै. काकासाहेब दांडेकर कॅम्लीन हा कला शिक्षकाचा (१९९९)
प्रथम पुरस्कारही
• २००१, २००५ व २००६ या वर्षी राज्य शासनाचे उत्कृष्ट
वाङ्मयनिर्मितीचे तीन पुरस्कार प्राप्त."

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hasat Khelat Vidnyan Shika | हसत खेळत विज्ञान शिका”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat