Description
इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षे या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात अशा प्रकारे वागावे याचे ज्ञान आणि माहिती दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासार विचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथांनी आबालवृद्धांना मार्गदर्शन केले आहे. इसापने सांगितलेली प्रत्येक कथा आपल्याला काही तरी शिकवणारी आहे. इसापच्या नीतिकथांत दडलेले तात्पर्य इथे उलगडून सांगितले आहे. या कथांना मुलांना आवडणाऱ्या खेळांची या पुस्तकात जाणीवपूर्वक जोड दिली आहे. कथांना जोडून येणारे हे खेळ मुलांना या कथाविश्वास गुंगविणारे आहेत. मुलांचे तर्कज्ञान वाढविणाऱ्या नीतिकथांसोबत आलेले खेळ मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करणारे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारे आहेत. गमतीदार खेळांमुळे इसापच्या नीतिकथा कायम स्मरणात राहतील याची हमी देणारे पुस्तक. |
Reviews
There are no reviews yet.