Description
विनोद जैतमहाल हे जालना येथील रहिवासी असून ते पत्रकार, कवी, गीतकार, सिने-नाट्यअभिनेते, वक्ते, लेखक म्हणून परिचित आहेत.
जन्म : १ डिसेंबर १९७१.
जन्मस्थळ : तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)
मूळ गाव : बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)
शिक्षण : एम. ए. संस्कृत (साहित्य), जनसंवाद व पत्रकारिता पदवी
(सुवर्णपदक विजेते), नाट्यशास्त्रात व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संगणक अभियांत्रिकी पदविका, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व उर्दू या भाषांचे अभ्यासक.
विविध क्षेत्रांतील अनुभव :
• संगणक तंत्रज्ञ, विविध कंपन्यांमध्ये नोकरी व व्यवसाय.
• वृत्तनिवेदन व लेखन : जालना व अहमदनगर स्थानिक टीव्ही न्यूज ‘अभी तक’साठी (२००३).
• संपादक व उपसंपादक : दै. आनंद नगरी जालना व दै. दिव्य मराठी छ. संभाजीनगर (२००८ ते २०१६).
• संस्कृत शिक्षक : आरएचव्ही इंग्लिश मीडिअम स्कूल, जालना.
• कंटेंट व जाहिरात लेखक : टार्डिग्रेड फिल्म्स मुंबई, एआर मीडिया, लातूर, जेबी स्टुडिओ जालना, राजमार्ग प्रोमोशन्स, चिखली.
• सल्लागार संपादक : दैनिक ‘आधुनिक केसरी’ (२०२१ पासून).
सिनेमा, नाटक व कलाक्षेत्रातील प्रवास :
• आगामी मराठी चित्रपट ‘कपल’ व ‘मिशन पँथर’.
• राज्य नाट्यस्पर्धेत १९९५ पासून सतत सहभाग. अंतिम फेरीत दाखल ‘घोळमटण’ व ‘ती’ या नाटकांमध्ये विशेष भूमिका.
• ‘दलपतसिंग येती गावा’ नाटकात भूमिका व गीतलेखन. लेखक मकरंद साठे, राजकुमार तांगडे, दिग्दर्शक अतुल पेठे.
• ‘म्हादू’ या मराठी चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक संदेश भंडारे.
• ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या व्यावसायिक नाटकात ‘शाहीर मिलिंद कांबळे’ ही मुख्य भूमिका. संकल्पना लोकशाहीर संभाजी भगत, लेखन राजकुमार तांगडे, दिग्दर्शन नंदू माधव.
लेखन :
• गीतकार जावेद अख्तर यांच्यासाठी उर्दू मानपत्र व माहितीपटाचे लेखन. (‘आयफा’ मध्ये प्रदर्शित) (२०२३).
• सीडलँड, रूपम स्टील, शक्तिगोल्ड स्टील, भूमी कॉटेक्स, राजकीय प्रचारासह जाहिरातपटांचे लेखन व व्हॉइसओव्हर.
• पथनाट्ये, एकांकिका : उत्तर तुमच्या खिशात, वी द पीपल (इंग्रजी), हमारा संविधान, जिवंत असाल तर या, धारदार.
• लघुपट : ‘आष्टी १९४२ एक वीरगाथा’ (हिंदी पटकथा, संवाद, गीते, पार्श्वगायन.) यासह अनेक लघुपट.
• ब्लॉग : एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पोर्टलवर ब्लॉगलेखन, ‘शब्द काय सांगतात?’ हा व्युत्पत्तिविषयक ब्लॉग.
• पुस्तके : १. ‘समाज माध्यमांवरील लेखनकौशल्ये’ (ऑगस्ट २०२४), २. ‘जाहिरात-विश्व अॅडव्हर्टाइजमेंटविषयी सर्व काही’ (जानेवारी २०२६) (साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर), दोन्ही पुस्तके डॉ. बा. आं. म. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात.
पुरस्कार :
• दैनिक आधुनिक केसरीचा ‘आयडॉल महाराष्ट्र २०२४’ पुरस्कार.








Reviews
There are no reviews yet.