fbpx

Jannayak Tantya Bhilla | जननायक तंट्या भिल्ल

₹200

148Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 9788177868265

Share On :

Description

एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध तंट्या भिल्लानं तापी-नर्मदाखोऱ्यात अकरा वर्षं एकाकी संघर्ष केला.
तो गरिबांना लुबाडणारे जुलमी सावकार आणि सावकारांना मदत करणाऱ्या पोलिसांचा वैरी होता. गरिबांचा मात्र तो कैवारी होता. महात्मा फुले गरिबांना शिकविण्यासाठी झगडत होते, तर हा आदिवासी क्रांतिवीर बलाढ्य ब्रिटिशसत्तेशी दऱ्याखोऱ्यात एकाकी झुंजत होता. शोषित अन नागवल्या गेलेल्या शेतकरी-आदिवासींना मदत करत होता सरकारने दरोडेखोर ठरविलेला हा आदिवासी वीर जनतेचा पालनहार बनला होता. आमच्या इतिहासानं मात्र या क्रांतिवीराची दखलच घेतली नाही.
बाबा भांड यांनी ब्रिटिशकालीन दस्तऐवज, लोकगीत, लोककथा अन् हजारो लोकांच्या मुखातून जनमानसात टिकून राहिलेल्या या जननायकाची चरित्रकथा लिहिली आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य स्वातंत्र्यलढ्याची ही अद्भुत कथा इतिहासाचे पुनर्वाचन करणारी आहे.

Additional information

About Author

बाबा भांड
जन्म वडजी, पैठणजवळील खेड्यात, २८ जुलै १९४९.
बालपणापासून कमवा व शिका हा संस्कार. शिक्षण एम. ए. इंग्रजी. आठवीत बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. दहावीत जागतिक स्काउट-गाइड मेळाव्याच्या निमित्तानं अमेरिका-कॅनडा आदी दहा देशांचा प्रवास. लेखकच व्हायचं स्वप्न होतं. सहावीपासून लेखनास सुरुवात. १९७५ साली पत्नी सौ. आशाच्या मदतीनं धारा व नंतर साकेत प्रकाशनाची सुरुवात. आतापर्यंत अठराशे पुस्तकांचे प्रकाशन.
बाबा भांड यांच्या आतापर्यंत नऊ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णनं, चार ललित गद्य, चार चरित्रं, चार आरोग्य व योग, नऊ संपादनं, चार अनुवाद, पंधरा किशोर कादंबऱ्या, एकोणावीस बालकथा संग्रह, तीन एकांकिका, सत्तावीस नवसाक्षरांची पुस्तके प्रकाशित.
साहित्य अकादमीचा बालसाहित्य, महाराष्ट्र शासनाचे अकरा, महाराष्ट्र फाउंडेशन, दमाणी आणि इतर पंधरा पुरस्कार. त्यांच्या साहित्यावर पाच विद्याथ्यांची पीएच.डी., अभ्यासक्रमात पुस्तके व पाठ.
जन्मगावी पाणलोटक्षेत्र विकास, वाचनालय, गरीब अपंग-मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, योगसाधना संस्थेत विश्वस्त, समाजोपयोगी कामात सहभाग, प्रकाशनाच्या कमाईतून वरील कामासाठी पंचवीस लाखांहून अधिक मदत. लेखन-प्रकाशनासोबत शेती, प्रवास आणि फोटोग्राफीचा छंद. महत्त्वाचं जग फिरून झालंय.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, तसेच सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.
email : baba.bhand@gmail.com, http://www.bababhand.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jannayak Tantya Bhilla | जननायक तंट्या भिल्ल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat