Description
“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते.
जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती.
काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोबर भुईसपाट झाला होता.
मनाला आलेला विफलपणा, पुढच्या आयुष्यातला एकटेपणा हे सगळं तिला सहन होणार होतं का? इतकी वर्षं ती शिणली, कष्टली… हाती काय काय राहिलं होतं? सागराचं पाणी ओंजळीतून गळून जावं तशी सर्व नाती गळून गेली होती. शेवटी शेवटी ती एकटी, ती एकटीच राहिली होती. निष्काम कर्म- उच्चारायला शब्द फार सोपे; पण आचरणात महाकठीण.
वेळेचं चक्र घरंगळत चाललंच होतं.
आयुष्यातून कोणालाच सुटका नव्हती. मनासारखं होत असलं म्हणजे दिवसांची यादच राहत नाही.
आणि असं काही विपरीत घडलं की, क्षणाक्षणाचा बोजा असह्य होतो. एकटीचे हात तर अति दुर्बल होतात.
एकेका क्षणाचं हे वजन, मग सेकंदाचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष… ती अजस्र रास पाहूनच जीव दडपून जातो. असं वाटतं या रात्रीखाली शरीर पिंजून जाणार आहे… त्याचा चेंदामेंदा होऊन जाणार आहे.”
या पुस्तकात आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान आलेल्या रोमांचक आणि चित्तथरारक अनुभवांचे अतिशय रंजकपद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या वन्यपशूनी समृद्ध असणाऱ्या प्रदेशातील हे चित्तथरारक प्रसंग आहेत.
सिंह, बिबटे, चित्ते, हत्ती, रानगवे नि अजगर या शेजारीमंडळींसोबत मरेरे जंगलात राहणारे डॉस्टन दाम्पत्य, त्यांच्या जीवनात आलेल्या ‘अजगराचा दिवस’, ‘बिबट्याची संध्याकाळ’, ‘हत्तीची रात्र’, ‘सिंहाचे प्रभातदर्शन’ यासारख्या चित्रविचित्र प्रसंगांशी कशी झुंज देतात याचे प्रसंगचित्रण ‘आफ्रिकेतील थरार दिवस… थरार रात्री!’ या कथेतून वाचावयास मिळते. आफ्रिकेत घडलेली अनेक थरारनाट्येही यामध्ये आहेत.
वाचकांना क्षणभर स्तब्ध करणारे व उत्कंठा शिगेला पोहोचविणारे थरारक प्रसंग या कथासंग्रहात आलेले आहेत. प्रसंगाचे रोमांचकारी, चित्तथरारक असे हुबेहूब वर्णन करत वाचकास अंतर्मुख करणे हे विजय देवधरांच्या लेखनाचे मूलभूत वैशिष्ट्य या कथासंग्रहातही अनुभवण्यास मिळते.
Reviews
There are no reviews yet.