Kahani Eka Wranglerchi | कहाणी एका रँग्लरची

₹100

96Pages
AUTHOR :- Sumati Vishnu Narlikar
ISBN :- 9788177868982

Share On :

Description

अनेक जन्मांचे सुंदर संस्कार घेऊन एका पवित्र व सुसंस्कृत कुलात तात्यासाहेब जन्माला आले. तात्यासाहेब म्हणजेच रँग्लर विष्णू नारळीकर. सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे ते वडील होते.
विचारांची, आचारांची व बोलण्याची पवित्रता हाच रँग्लर नारळीकरांच्या जीवनाचा स्थायिभाव होता. वयाच्या चोविसाव्या वर्षी- अगदी लहान वयात काशी विश्वविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख म्हणून तात्यासाहेबांची नियुक्ती झाली. कॅम्ब्रिज विश्वविद्यालयाचे ‘‘बी स्टार’’ रँग्लर- तात्यासाहेब गणिताप्रमाणेच इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या चार भाषांमध्येही पारंगत होते. त्यांच्या भव्य-दिव्य, असामान्य व्यक्तिमत्त्वावरील एक प्रकाशझोत म्हणजेच ‘कहाणी एका रँग्लरची’ ही पुस्तकरूपी जीवनगाथा.
रँग्लर नारळीकरांच्या जीवनप्रवासात त्यांना अखंड साथ देणार्या त्यांच्या पत्नी सुमती नारळीकर यांनी त्यांच्या आठवणी या पुस्तकात चित्रित केल्या आहेत. तुम्हा-आम्हा सर्वांनाच या आठवणी उद्बोधक व प्रेरणादायी ठरतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kahani Eka Wranglerchi | कहाणी एका रँग्लरची”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat