Description
असे म्हणतात, पृथ्वीवर परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळी त्याचे दूत इथे येतात आणि आपल्या कार्यातून त्याच्या चिरंतन, शाश्वत मूल्यांची समाजाला आठवण करून देतात. विश्वमाता मदर टेरेसा या तर दीन, वंचितांसाठी जणू परमेश्वराचेच प्रतिरूप होत्या. ‘पैसा दिला म्हणजे समाजकार्य केले’ या समजुतीच्या पुढे जाऊन दीन, दु:खितांच्या कल्याणासाठी त्यांनी जे सेवाक्रत स्वीकारले ते शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत निष्ठेने जोपासले व त्यातही त्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या.
‘दु:खितांना नाव, गाव, जात विचारायची नसते; त्यांना फक्त विचारावे, ‘तुमचे दु:ख कोणते?’ ही लहानपणी झालेली शिकवण त्या अक्षरश: कृतीतून जगल्या व असंख्य भारतीयांवर आपल्या सेवेच्या व मायेच्या अमृताचे सिंचन केले.
हे पुस्तक लिहिताना लेखकाने आपले संपूर्ण कसब पणाला लावले आहे, हे म्हणावेच लागेल. अतिशय साधी; पण हृदयस्पर्शी भाषा व मदर टेरेसा यांचा जीवनपट उलगडून दाखविणार्या रंजक गोष्टी या खास वैशिष्ट्यांमुळे पुस्तक सगळ्या लहान-थोर वाचकांना प्रिय होईल हे नक्की.
Reviews
There are no reviews yet.