Price Action Trading I Multibagger Stocks

₹450

336 Pages
AUTHOR :- Indrazith Shantharaj , Prasenjit Paul
ISBN :- 978-9352205905

Share On :

Description

” तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते.

मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.
अत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे.

मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे. स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.

प्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे.

गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.

————————————————————————————————————————–

तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन : मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ? RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ? हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’
प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.
प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ? प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Price Action Trading I Multibagger Stocks”

Your email address will not be published. Required fields are marked *