Rahasya Vanshaveliche | रहस्य वंशवेलिचे

₹250

280Pages
AUTHOR :- Atul Kahate
ISBN :- 9788177867619

Share On :

Description

माणसाला स्वतःविषयी आणि नव्यानं जन्म घेणाऱ्या प्रत्येकाविषयी विलक्षण कुतूहल असतं. आपल्या घरातही बाळ जन्मलं की, लगेचच ‘त्याचं नाक किती त्याच्या आईसारखं आहे ना!’ किंवा ‘अगदी आजीवर गेली आहे ही’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात होते. या तुलना अर्थातच नव्यानं जन्मलेलं मूल आपले आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा, मावशी-आत्या अशा अनेक नातेवाइकांसारखंच असणार अशा अपेक्षांमधून होतात. या अपेक्षांचं मूळ आनुवंशिकतेमध्ये असतं.
माणसाच्या सगळ्या गुणधर्मांचं रहस्य ‘जेनेटिक्स’ या विषयामध्ये दडलेलं आहे. जगभरात याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. इथून पुढे कुठल्याही माणसाला त्याच्या वयाच्या कितव्या वर्षी मधुमेह होईल किंवा त्याला कर्करोग व्हायची शक्यता किती टक्के असेल अशांसारख्या अनेक गोष्टींच्या संदर्भातले जवळपास अचूक अंदाज व्यक्त करणं शक्य होईल. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला इतिहास अत्यंत रंजक आहे. तसंच पूर्वीपासून आजपर्यंत या विषयामध्ये प्रगती कशी होत गेली आणि नवनवे शोध कसे लागत गेले हे समजून घेणं सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीनंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
‘जेनेटिक्स’ हा क्लिष्ट विषय नसून तो अत्यंत सहजपणे समजून घेणं शक्य आहे असा आत्मविश्वास वाचकाला देणारं हे पुस्तक आहे.
“अतुल कहातेचं हे पुस्तक प्रत्येक माणसानं वाचलंच पाहिजे असं मी म्हणेन … जेनेटिक्समधल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना अगदी सहजपणे त्यानं मांडल्या तर आहेतच; पण शिवाय या विषयाचा पूर्वीपासून त्यानं रेखाटलेला इतिहासही अत्यंत रंजक आहे.”
– संजीव गलांडे (‘डॉक्टर भटनागर’ पुरस्कारानं सन्मानित झालेले ‘जेनेटिक्स’ विषयामधले शास्त्रज्ञ)

Additional information

About Author

अतुल कहाते
१. एमबीए पदवीधर
२. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १७ वर्षं अनुभव – सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक या कंपन्यांनंतर आता ओरॅकल फिनॅन्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरमध्ये 'तंत्रज्ञान प्रमुख.'
३. टाटा मॅकग्रॉ-हिल आणि पियरसनतर्फे भारतात आणि जगभरही वापरली जाणारी कॉम्प्युटरविषयीची २० पाठ्यपुस्तकं, काहींच्या आंतरराष्ट्रीय आवृत्त्या आणि चिनी भाषेत अनुवाद.
४. मराठीमध्ये 'आयटीतच जायचंय', 'कहाणी फ्ल्यूची', 'गुलाम', 'बोर्डरूम', 'च ची भाषा', 'महामंदीच्या उंबरठ्यावर', 'स्टीव्ह जॉब्ज', 'फिडेल कॅस्ट्रो', 'गुगल', 'फेसबुक', 'अमॅझॉन', 'महामंदीतून सुटका' ही याआधीची पुस्तकं.
५. क्रिकेटवर 'मुश्ताक अली' आणि 'महाराष्ट्र इन रणजी ट्रॉफी' ही पुस्तकं.
६. वयाच्या १२ व्या वर्षांपासून वर्तमानपत्रांमध्ये क्रिकेटविषयीचं लिखाण.
७. लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, साप्ताहिक सकाळ, लोकमत, साधना, केसरी, तरुण भारत, सामना अशा सगळ्या मराठी वृत्तपत्रांमधून/मासिकांमधून ४००० च्या वर लेख प्रकाशित आणि 'कहाणी इंटरनेटची', 'तंत्रमंत्र', 'कहाणी बिनतारी संदेशवहनाची', 'बखर संगणकाची', 'वैद्यकायन', 'विज्ञानवाद', 'क्रिकेटच्या नियमांमधल्या गमतीजमती', 'क्रिकेट गमती', 'प्राणिजगत', 'क्रिकेटनामा' इत्यादी सदरं प्रकाशित.
8. क्रिकइन्फो, क्रिकेट आर्काइव्ह आणि इंडिकथ्रेड्स या वेबसाईटस्वर अनेक लेख प्रसिद्ध.
९. दूरदर्शन (सह्याद्री चॅनेल), आयबीएन लोकमत, स्टार माझा, साम या टीव्ही चॅनेल्सवर तंत्रज्ञानाविषयीचे अनेक कार्यक्रम.
१०. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी, एमईटी इत्यादी अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चरर.
११. इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, इंदिरा एक्सलन्स ॲवॉर्ड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rahasya Vanshaveliche | रहस्य वंशवेलिचे”

Your email address will not be published. Required fields are marked *