fbpx

Saket Marathi-Marathi Shabdakosh | साकेत मराठी -मराठी शब्दकोश

₹500

386Pages
AUTHOR :- S.D.Zambre
ISBN :- 9788177865943
Order On Whatsapp

Share On :

Description

या शब्दकोशात १८,००० मराठी शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या लिखाणात, वाचनात आलेल्या जवळपास प्रत्येक मराठी शब्दांचा अर्थ आपणास समजेल. आपण लहानपणापासून मराठी भाषा बोलत आलो आहोत, लिहीत आलो आहोत. त्यामुळे आपण अगदी सहजरीत्या मराठी भाषा लिहू शकतो, बोलू शकतो; पण अनेकदा असे होते की, आपण बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांचा नेमका अर्थच आपणास कळत नाही किंवा सांगता येत नाही. खुपदा असेही होते की, एखादी घटना, प्रसंग सांगण्यासाठी आपल्याला नेमका शब्दच आठवत नाही. त्यावेळीही तुम्हाला शब्दकोशाचा उपयोग होईल. या शब्दकोशामुळे आपल्या लेखनातील व बोलण्यातील गोंधळ कमी होऊन त्याला एक प्रकारची परिपूर्णता येईल. आपले लेखन इतरांपेक्षा उठावदार दिसेल आणि त्या लेखनात नेमकेपणाही येईल; तसेच कमीत-कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आपणास व्यक्त करता येईल. जे लेखनाच्या बाबतीत तेच बोलण्याच्या बाबतीत देखील होईल. हा शब्दकोश लहानापासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यापासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडेल असा आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे अशी धारणा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात हा शब्दकोश असायलाच हवा.

Additional information

About Author

"मूळ संगमनेरचे असलेले स. ध. झांबरे हे मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले नामांकित शिक्षक आणि लेखक होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे शुद्धलेखन, निबंधलेखन, पत्रलेखन, अर्जलेखन, कथालेखन, मुलाखत लेखन, जाहिरात लेखन, मराठी व्याकरण इत्यादी विषयांसंदर्भात अमुल्य असे मार्गदर्शन केले.

स.ध. झांबरे लिखित मार्गदर्शक पुस्तकं :
निवडक निबंधाचा संग्रह
असे करा उत्कृष्ट निबंधलेखन
व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा
मराठीत भरपूर मार्क्स मिळवा
चला शिकूया उत्तम शुद्धलेखन
साकेत मराठी म्हणी व वाक्यप्रचार कोश
साकेत शुद्ध शब्दांचा कोश
साकेत मराठी-मराठी शब्दकोश
मराठी शब्दकोश
आपली राज्यघटना
आपली राष्ट्रगीते
आपली राष्ट्रमुद्रा

"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Saket Marathi-Marathi Shabdakosh | साकेत मराठी -मराठी शब्दकोश”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat