Description
जो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो’… बुद्धाचं मोठं अद्भुत वचन आहे. ‘तो अमानुषी रती प्राप्त करतो.
‘ तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैल आहे.
यालाच मी ‘संभोगातून समाधीकडे’ म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो.
एक रती आहे माणसाची, स्त्री आणि पुरुषाची.
क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे.
जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते. तुम्ही स्वतःलाच निकट करता.
एक रती आहे दुसऱ्याशी मिलनाची, एक रती आहे स्वतःशीच मिलनाची.
जेव्हा तुम्ही स्वतःशीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते. संभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे.
– ओशो
————————————————————————————————————————
“योग एक विज्ञान आहे. ते काही धर्मशास्त्र नाही. हिंदू-मुस्लिम, जैन किंवा ख्रिश्चन अशा कोणत्याही आत्मज्ञान्यांना या योगाशिवाय सत्यप्राप्तीचे आत्मज्ञान मिळालेले नाही, मकग तो येशू असो वा महंमद पैगंबर, पतंजली असो वा बुद्ध किंवा महावीर, जीवनातल्या परम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही.
ज्याला आपण रूढ अर्थाने धर्म म्हणतो त्याला श्रद्धेची जोड असते. योग ही श्रद्धेची नाही तर जीवनाच्या सत्याच्या दिशेने केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाची सूत्रबद्ध आचारपद्धती आहे.
ओशोंनी ‘योगाचे नवे पैलू’ या पुस्तकात योगरूपी सप्तदलांचे पुष्प अत्यंत साध्या; पण तितक्याच रसाळ भाषेत उमलवले आहे. योगाद्वारा मी कोण आहे हे जाणून घेऊन शेवटी मीच तो आहे, ‘अहं ब्रम्हास्मी’ या अंतिम मुक्कामापर्यंतचा प्रवास कसा करायचा हे सांगितले आहे.”
Reviews
There are no reviews yet.