fbpx

Sant Tukaram | संत तुकाराम

₹250

184Pages
AUTHOR :- Krishnarao Arjun Keluskar
ISBN :- 9789352200078

Share On :

Description

तुकारामबावांचे चरित्र
संत तुकाराम महाराज अर्थात तुकारामबाबांचे चरित्र हे गुरुवर्य केळूसकरांनी लिहिलेले मराठीतील गद्य रूपातील पहिले विस्तृत चरित्र आहे. १८९६ साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. यानंतर आता १२० वर्षांनी तो प्रथमच पुनर्प्रकाशित होत आहे. संत चरित्रे कशी लिहावीत, हे केळूसकरांनी महाराष्ट्रास प्रथमच दाखविले आहे. सत्यनिष्ठा, चिकित्सा व माहिती पडताळून पाहणे हे या पहिल्या तुकाराम चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे लिहिताना जितका भाग ऐतिहासिक ब खरा भासला तेवढाच येथे घेतला.  महाराष्ट्राचे महान संत तुकाराम महाराज यांचे मराठीतील पहिले चरित्र वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Additional information

About Author

कृष्णराव अर्जुन केळूसकर
वाङ्मयमहर्षी कृ. अ. केळूसकर गेल्या शतकातील महान चरित्रकार आहेत. राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखनाची प्रशंसा केली.
केळूसकर धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या गहन विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते; बहुजन समाजाच्या या वाङ्मयमहर्षीची महाराष्ट्राने उपेक्षाच केली.
संत तुकाराम महाराज, गौतमबुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषांचे ते मराठीतले पहिले महान चरित्रकार आहेत. त्यांनी पस्तीस चरित्र लिहिली. ते म. फुले यांची सत्यशोधक चळवळ, मराठा ऐक्येच्छू सभेचे कार्यकर्ते आणि जनात जनार्दन पाहणारे ऋषितुल्य प्रज्ञावंत होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sant Tukaram | संत तुकाराम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat